Headlines

सोनिया ची आणि माझी ओळख ……….. आणि तीने बांधलेली राखी

एक महीण्यापुर्वी सोनिया (सना) ची ओळख आठवडे बाजार मध्ये झाली. मी माझी ओळख तीला सांगितली नव्हती पण सना ने चांगलं ओळखलं असावं मला. आठवडे बाजारात सना पैसे मागत आपला उदरनिर्वाह भागवत असते. तीला ही वाटत असेल की,आपण ही इतर व्यक्तीन सारख जगाव पण असं आज समाज करू देत नाही सना सहज लोकांच मन जिंकून त्यांना आपलंसं करते हे तुझ्यातलं टॅलेन्टच आहे. अशा प्रकारच काम तुझा किती दिवस उदरनिर्वाह करणार आहे तुही समाजा बरोबर जगाव, त्यांना समजुन घ्यावं आणि हळुहळू नवीन सुरुवात  करावी इतरांच्या खांद्याला खांदा लावुन पुढे यावं. 
सना आज अनेक दिवसांपासून प्रत्येक बाजारात तीच्या स्वभावाने तीची ओखळ आहे. पण तृतीय पंथी असल्याने लोकांची बघण्याची दुष्टीकोन हा वेगळाच असतो. लोकांनी सना सारख्या अनेक तृतीय पंथींना आपल्यासारख सामन्या समजाव असं मला वाटतं आणि जी वागणुक लोकांकडुन इतरांना दिली जाते तशीच वागणुक सना सारख्या अनेक तृतीय पंथींना द्यायला हवी. 
मी अनुभवलेली तृतीय पंथी सना ही वेगळीच आहे सनाला सन्मान पुर्वक वागणुक दिली तर ती सर्व सामान्यच लोक तृतीय पंथींना घाबरता की ही काही वेगळी कृती करून आपल्याला मारेल कींवा भीती दाखवेल. पण तृतीय पंथी यांच्या सोबत राहुन बघा ,बोलुन बघा ती काही वेगळी वाटणार नाही आपल्याला अगदी सर्व सामान्यतः वाटेल. सनाचा फक्त आवाज पुरूषा सारखा आणि दिसायला महीले सारखी आहे बाकी ती तीही एक व्यक्तीच आहे.
सगळी निसर्गाची माया आहे जस सामान्य व्यक्ती ला बनवल तस तीला ही बनवलं आहे.
काल सना बाजारात आली तेंव्हा इतर दुकानदारांकडुन पैसे मागत होती. जेव्हा माझ्या जवळ आली तेव्हा तिला विचारलं मला राखी का नाही बांधली ती बोलु तु माझा भाऊ आहेस का? पण सनाला माझं बोलणं पटलं होत कारण येवढ्या मोठ्या बाजारात तीला कोणीच राखी बांध अस विचारलं नव्हतं. शेजारीच राखीच दुकान होत आणि सनाने मला राखी बांधली आणि बोली तुझ्या सारखा भाऊ मला भेटला हे माझ भाग्यच. या तुन फक्त एक म्हणायचं आहे मला की सना ही तृतीय पंथी आहे तर काय झालं ती एक सर्व प्रथम भारतीय नागरिक आहे. आपल्याला जेवढी फिरण्याची, जाॅब करण्याची इतरांन मध्ये मुक्त वावरण्याचं, शिक्षणाचा अधिकार आहे तसा तीला देखिल आहे त्यामुळे तीला ही सन्मान पुर्वक वागणुक द्यावी. आणि तिला ही इतरांसारख मुक्त वावरण्यास मदत करावी.

 – सदाशिव गणगे
[email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *