Headlines

संभव फाऊंडेशन देतय रोज ४०० लोकांना दोन वेळच जेवण

 



सोलापूर/ प्रतिनिधी- संभव फाऊंडेशन च्यावतीने शहरातील उपेक्षित हातावर पोट असणाऱ्या  झोपड्या आणि फुटपाथवर राहणाऱ्या ४०० लोकांना जेवण वाटप करण्यात येत असून यात रस्त्यावर राहणाऱ्या बेवारस मनोरुग्ण,वयोवृध्द आजीआजोबा,बेघर लोक,भिक्षेकरी,स्थलांतरीत कामगार 

 यांना संभव फाऊंडेशनच्या माध्यमातून  जेवणाची सोय करण्यात येत आहे शहरातील अनेक लोकांचा रोजगार बंद असून उदर्रनिर्वाह होत नाही आश्या लोकांना जेवण पुरवण्याचं कार्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या आठवड्यापासून सुरू आहे.रोजच्या जेवणामध्ये दाळ खिचडी,व्हेज पुलाव,मसाला राईस,चपाती भाजी दिली जाते.

 


 संभव फाऊंडेशनची टिम लोकांना मास्क,सॉनिटायझार सुरक्षित अंतर विषय मार्गदर्शक सुचना करत आहे.

 संभव फाऊंडेशनचे स्वंयसेवक आस्मिता गायकवाड,आरती लांडे,रुपाली हुडेकरी,राणी सिरसट,वृषाली गायकवाड,शोभा शेंडगे,भाग्यश्री सोनवणे,रुपाली पाटिल,पवन व्हनकडे,प्रा.सचिन शिंदे,संतोष माने,चेतन लिगाडे,पंकज क्षीरसागर,आदीच योगदान या मध्ये आहे.


समाजातील दानशुर लोकांची गरज असून येथील वंचित बेघर लोकांना पौष्टिक अन्न देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेत आहोत.कोरोनाच्या संकटकाळात आम्ही बेघर लोकांच्या सोबत आहोत त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय करून प्रयत्न सुटत नसलेतरी त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आम्ही हे कार्य सुरू ठेवले आहे –आतिश कविता लक्ष्मण अध्यक्ष संभव फाऊंडेशन ९७६५०६५०९८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *