Headlines

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा -बार्शीत कडकडीत बंद

 

 बार्शी/प्रतींनिधी – केंद्र सरकारणे शेतकरी विरोधी तिन कायदे हुकूमशाही पध्दतीने संमत केले आहेत याचा विरोध करण्यासाठी व दिल्ली अंदोलनाला पठिंब देणार्‍या देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी बार्शी मध्ये सर्वपक्षीय मोर्चा श्री. भाउसाहेब आंधळकर व काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.  हा मोर्चा शेतकरी, सर्वपक्षीय, कामगार वर्ग, विद्यार्थी कृती समिती यांच्या वतिने काढण्यात आले.  मोर्चा मार्कट यार्ड पासून हालगीच्या नादात निघून तहसिल कचेरिवर पोहचला.  मोर्चात महिला व तरूणंाची संख्या जास्त होती.

यावेळी काॅम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले,  आरएसएसची विचारधारा जपणारे हे सरकार भांडवलदारी विचारधारेचे असल्याने त्यांना शेतकर्या जमीनींचे कंपनीकरण करून शेतकरी उदवस्थ करून टाकायचा आहे, परंतू देशातील शेतकरी या कटा विरोधात चिकाटीचा लढा लढतील.

श्री भाउसाहेब आंधळकर म्हणाले,  भाजपा ही शेतकर्‍यांची लूट करण्याच्या उद्देषाने हे कायदे करीत आहे या विरोधात शेतकरी वर्गासोबत आम्ही तिव्र पनाने लढत राहू.

या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, शिवसेना, राष्‍ट्‍रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आय, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहूजन आघाडी, अधश्रध्दा निर्मूलन समिती, समता परिषद, मार्‍क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भरीप, संभाजी बिग्रेड, इंटक संलग्न राष्‌ट्‍रीय गिरणी कामागर संघ, आयटक डाॅ. जगदाळे मामा हाॅस्पीटल श्रमिक संघ, आयटक बांधकाम कामगार संघटना, आॅल इंडिया स्टुडंन्टस फेडरेशन, कन्फेडरेशन युनियन, मूलनिवासी, उडाण फाउंडेशन, राष्‍ट्‍रवादी लिगल सेल, एमआयएम, आदिवाशी संघटना सहभागी झाल्या होत्या.

यावेळी मोर्चा तहसिल कचेरिवर पोहचताच, तेथे सभेत रूपांत झाले यावेळी, नागेष अक्कलकोटे, अॅड. सुप्रिया गुंड, अॅड. आरगडे मॅडम, दिपक आंधळकर, लक्ष्मण घाडगे, प्रा. काॅ. एस.एस. जाधव, प्रा. डाॅ. अशोक कदम, अॅड. विक्रम सावळे, काॅ. प्रविण मस्तुद, आनंद काशिद, काॅ. शौकष शेख, काॅ. अनिरूध्द नखाते, धनंजय जगदाळे, विवेक गजशिव, रियाज शेख, निखील मस्के, तानाजी बोकेफोडे, पवन आहिरे, शाफीन शेख, सुरेश चकोर, जीमल खान, नितीन भोसले, नागजी सोनवणे, वसिम पठाण,यांनी मनोगत व्यक्त केले. 

मोर्चाचे निवेदण मा. पंतप्रधान व मा. केंद्रीय कृषीमंत्री यांना मा. तहसीलदार प्रदिप शेलार यांच्या मार्फत देण्यात आले तहसिलदारांनी निवेदण शासनास कळवित असल्याचे सांगितले.

मोर्चा पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *