Headlines

वैद्यकीय अधीक्षक डॉ मस्के यांचा सन्मान


सोलापूर/अमीर आत्तार  –जगात कोरोना या महामारी ने थैमान घातले असून त्याचे मोठया प्रमाणात पडसाद देशात राज्यात व सोलापूर जिल्ह्यात उमटले असून याच काळात कोरोना रोगावर उपचार करून घेण्यासाठी रोज शेकडो लोक सिव्हिल हॉस्पिटल मध्ये येत होते खासगी हॉस्पिटल बंद असल्यामुळे कोरोना या जीवघेण्या आजाराबाबत उपचारासाठी सिव्हिल तुडुंब भरत असून याचा भार सिव्हिल हॉस्पिटल मधील सर्वच डॉक्टर व  आरोग्य कर्मचारी यांच्यावर प्रचंड भार व तणाव निर्माण झाला असताना सिव्हिल हॉस्पिटल मधील वैधकीय अधीक्षक डॉ औदुंबर मस्के हे आपल्या कुटूंबाला बाजूला सारून  व आपला जीवधोक्यात घालून कोरोना रोगाची लागण झालेल्या शेकडो लोकांचे रात्रंदिवस उपचार करून  प्राण वाचवले होते डॉ मस्के यांनी कोरोना बाबत सर्वसामान्य माणसाची केलेली सेवा ही खूपच मौल्यवान व जोखमीची तर होतीच शिवाय जीवावर बेतणारी होती अश्या योद्धया अधिकारी यांचे मनोधेर्य वाढवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीने सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉ मस्के यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या महान कार्याबाबत कौतुक करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, शहर अध्यक्ष अरुण सिदगिड्डी, डॉ रवींद्र सोरटे, भास्कर अल्ली, राकेश वरम, बिपीन दिड्डी, श्रीनिवास पेद्दी इत्यादी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *