Headlines

वाणीचिंचाळे येथे हिरवाई बहरली , संपूर्ण वनविभागात हिरव्यागार रंगाची उधळण

या हरीत गाव करण्याच्या चळवळीला काहीजण  हरताळ पाळत आहेत. यामुध्ये झाडाच्या जाळ्या चोरुन नेणे,चोरून रात्रीच्या वेळी जनावरे वनविभागात चारणे,शिकार करणे  या गोष्टी पण काहीजण करत आहेत यावरही आळा बसला तर गाव एक हरीत माँडेल म्हणून येईल.यावर सर्वांनीच हि वनसंपदा आपली आहे ,याची काळजी आपण सर्वजण घेतली तरच जंगल वाचेल अन्यथा येरे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या अशा प्रत्यय येईल.सर्वानीच वनांची काळजी घेऊन जर सहकार्य केले तर गावाला पावसाचे प्रमाण वाढेल व पर्यायाने गावात पिके चांगली येतील व हि वन साखळी वाचेल

पंढरपूर/नामदेव लकडे – सर्वत्र वनसंवर्धन दिन साजरा होत असतानाच वाणीचिंचाळे वनविभागात हा निराळा योग दिसून येत आहे. तसेच सध्या पाऊस पडल्यामुळे वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या झाडे लागवडीमुळे सर्व परीसर हिरवागार दिसत आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फाही झाडे वाढल्यामुळे अतिशय सुंदर चित्र दिसत आहे.
वाणीचिंचाळे गावाने पाणी फाऊंडेशनच्या यशानंतर गावात  हरीत गाव करण्याची संकल्पना मांडली .या मोहीमेला वनविभागाचे अधिकारी तसेच वनमजुर व गावकरी हातात हात घेऊन गावात वनांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नाला यशही आले आहे. यामुळे गावातील वन परीसर हिरव्यागार शालु घातल्यासारखा दिसत आहे.
या झाडामध्ये कडुनिंब, काशीद,शिसव,करंज,पळस,वड,पिंपळ, जांभूळ, गुलमोहर, कांचन,शिरीष,चिंच अशा विविध प्रकारची झाडे फुलली आहेत.इतर गावामध्ये कायम वन विभागाच्या कारभारावर  गावकरी समाधानी नसतात परंतु वाणीचिंचाळे गावात वनविभागाचे सहकार्य खुप चांगल्या प्रकारे मिळुन गावाला आता पहिले दिवस येऊ लागले आहेत.
 वनविभागाच्या या कामगिरीमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी बाटे साहेब, वनपाल खंडेभराड साहेब, वनरक्षक बादने साहेब, वनमजुर कोरे यांचे सहकार्य खुपच मिळत आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे सुर्यवंशी साहेब, बनसोडे, वन कर्मचारी कैलास गडहिरे,गायकवाड यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे यामुळेच गावात हि हरीत गाव संकल्पना रूजू लागली आहे.
तसेच गावातील अनेक लोकांना या चळवळीत सहभागी होत आहेत .ते आपल्या स्वखर्चाने देशी झाडे  वनविभागात लावून आपला खारीचा वाटा उचलत आहेत.अशाच पद्धतीने सर्व गावातील लोकांनी या हरीत गाव करण्याच्या मोहीमेला सहकार्य करावे अशी अपेक्षा ही व्यक्त होत आहे.
 या ठिकाणाला गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व पदाधिकारी ,ग्रामस्थ यांनी भेट देऊन सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच या क्षेत्रात देशी झाडे लावावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच गावात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना गावात कायमच सहकार्य केले जाते. परंतु जर चुकीचे काम केले तर गय केली जात नाही असे सांगितले. गावात सर्व ग्रामस्थ व वनविभागाचे अधिकारी यांनी हातात हात घेऊन काम केले तर काही होऊ शकते हे या उदाहरणावरून दिसून येत आहे.तसेच गावातील राहिलेल्या वनविभागात देशी झाडांची लागवड करावी अशी अपेक्षा गावातील पदाधिकांऱ्यानी केली आहे.
जर गावात अशा प्रकारे झाडे लावली व संगोपनासाठी फक्त वनविभागाचे सहकार्य असुन चालणार नाही तर गावातील प्रत्येक नागरिकांना हे जंगल आपले आहे याची जाणीव झाली तर गावात खुप वनसंपदा वाढेल पर्यायाने गाव हिरवेगार दिसू लागेल व पर्यावरणाचा समतोल राखुन प्रर्जन्यमान वाढेल याची खात्री आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *