Headlines

लोकशाहीवादी पुरोगामी विचारवंतवरील खोटे दोषारोप पत्र मागे घ्या.-कॉ. नरसय्या आडम (मास्तर)


माकप कडून गृहमंत्री अमित शहा यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन.

माकपच्या शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांना अटक व प्रमुख नेते यांच्यावर गुन्हे दाखल 

सोलापूर/शाम आडम :- संबंध देशभर CAA, NRC च्या विरोधात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील होते. दिल्ली येथील शाहीन बाग येथे अबालवृद्ध महिला या लढाईचे नेतृत्व करत होते. हि लढाई सनदशीर आणि न्याय हक्काची होती. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या प्रस्थापितांना पायदळी तुडविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने जनता स्वतःचा आवाज बुलंद करत होती. या दरम्यान धर्मांध आणि प्रतिगामी शक्तीच्या लोकांनी दिल्लीतील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्यासाठी हेतुपुरस्सर पूर्वनियोजित कट कारस्थान करून दंगल घडविले. मात्र केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस प्रशासन याला सर्वस्वी जबाबदार देशातील लोकशाहीवादी, पुरोगामी विचारवंत, साहित्यिक, कलावंत, विद्यार्थी, राजकीय पक्षाचे नेते यांना लक्ष्य करून त्यांच्यावर खोटे आरोप लावून दोषारोप पत्र दाखल केले. हे धादांत खोटे आहे. देशात सध्या अस्तित्वात असणारे केंद्र सरकार लोकशाहीचा खून पाडून संविधान धोक्यात आणले आहे. याचे रक्षण करणे प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे. म्हणून देशहित आणि संविधान रक्षणासाठी चाललेल्या या लढाईत माकपाचे महासचिव, माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांच्यावर दोषारोप पत्र मागे घ्या अन्यथा याहून अधिक उग्र स्वरूपाची लढाई करणार असल्याचा जाहीर इशारा ज्येष्ठ कामगार नेते कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिला. 
मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी मा. जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाहीवादी, पुरोगामी विचारवंतावरील खोटे दोषारोप पत्र तातडीने मागे घ्या हि प्रमुख मागणी घेऊन ज्येष्ठ कामगार नेते राज्य सचिव, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व सोलापूर माकप जिल्हा सचिव अॅड. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला. यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. तरुण कार्यकर्ते गगनभेदी आवाजात अमित शहा मुर्दाबाद, दिल्ली पोलीस प्रशासन होश में आहो, सीताराम येचुरी यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या, घोषणा देत पुतळ्याचे दहन केले. 
ते बोलताना पुढे म्हणाले कि, दिल्ली पोलिसांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, जगद्विख्यात अर्थशास्त्रज्ञ जयती घोष, दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक अपूर्वानंद, स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव आणि डॉक्युमेन्टरी चित्रपट दिग्दर्शक राहुल रॉय यांच्यासह कित्येक प्रसिध्द व्यक्तींची नावे गोवली आहेत. या सर्वांनी आंदोलनाला एका ‘योजनेनुसार’ फूस दिल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या  ५०/२० क्रमांकाच्या एफ आय आर मध्ये या प्रख्यात व्यक्तींची नावे गोवण्यात आली असून सीएए आणि एनआरसी विरोधी आंदोलकांना त्यांनी भडकावल्याचा आरोप केला आहे. प्रमुख विरोधकांना बदनाम करण्यासाठी आणि त्यांना खोट्या आरोपांत अडकवण्यासाठी पोलीस आणि सीबीआय, एनआयए, ईडी आदी केंद्रीय यंत्रणा आपल्या अधिकाराचा बेमुर्वतपणे गैरवापर करत आहेत, त्याचाच वरील भाकडकथा हा एक भाग आहे. या सर्व यंत्रणांची कार्यपध्दती अगदी स्पष्ट  आहे. संविधान पायदळी तुडवत आपल्या सत्तेचा गैरवापर करणाऱ्या सरकारला जोरदार विरोध करणाऱ्यांवर भयानक अशा रासुका, युआपा आणि देशद्रोहाची कलमे लावून तुरूंगात डांबण्याचे आणि छळण्याचे प्रकार आता नवे राहिलेले नाहीत. भीमा-कोरेगांव प्रकरणी एनआयए बेलगामपणे आपल्या मर्यादा ओलांडत आहे, हे काही लपून राहिलेले नाही. डॉ. काफील खान यांना रासुकाखाली तुरूंगात डांबले होते; अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करून त्यांच्यावर लादलेली रासुकाची कलमे रद्द करायचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यावरून एनआयए कशी हडेलहप्पी करत आहे, हेच अधोरेखित झाले आहे. या सर्व घडामोडी लोकशाही आणि संविधानावर होत असलेल्या आघाताच्या निदर्शकच आहेत. 
यावेळी माकपाचे सर्व नेतेगण व कार्यकर्ते काळ्या रंगाचे वस्त्र, काळ्या फिती, काळी झेंडे दाखवून केंद्र सरकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्ली पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केले. या दरम्यान पोलीस आणि कार्यकर्ते यांची झटापट झाली. यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या  पोलिसांनी कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक केले. व यातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केले. 
यावेळी नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, नलिनीताई कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख (मेजर), म.हनीफ सताखेड, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, रंगप्पा मरेड्डी, सलीम मुल्ला, सलीम पटेल, माशाप्पा विटे, मुरलीधर सुंचू, अनिल वासम, अशोक बल्ला, दाउद शेख, नरेश दुगाणे, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, फातिमा बेग, विल्यम ससाणे, बापू साबळे, दत्ता चव्हाण, अकिल शेख, बापू कोकणे, जावेद सगरी, विक्रम कलबुर्गी, वासिम मुल्ला, हसन शेख, रफिक काझी, दीपक निकंबे, अप्पाशा चांगले, विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्याल, श्रीनिवास गड्डम, मोहन कोक्कुल, बालाजी गुंडे, मल्लेशम कारमपुरी, शाम आडम, दिनेश बडगु, मल्लिकार्जुन बेलीयार, अंबादास बिंगी, रवी गेंटयाल, बजरंग गायकवाड, इब्राहीम मुल्ला, युसुफ शेख, आरिफ मणियार, किशोर गुंडला, आदींसह शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभाग नोंदवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *