Headlines

मी शेतकऱ्यांचा मुलगा ,केंद्र आणि राज्य शासनाकडे शेतकर्यांच्या भावना पोचवणार – राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भावनिक साद

मी शेतकऱ्यांचा मुलगा ,केंद्र आणि राज्य शासनाकडे शेतकर्यांच्या भावना पोचवणार शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्याना राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भावनिक साद 

प्रतिंनिधी/अमीर आत्तार – प्रत्येक वेळा शासनातील लोकं सोईनुसार धोरण राबवतात.केंद्र सरकार एकीकडे जीवनाश्यक वस्तूंबाबत कायदा करते,मग दुसरीकडे कांदा निर्यात बंदीचा निर्णय का करत आहांत?असा सवाल शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी   यांच्याकडे केला.करोना लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.कांदाप्रश्नी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्यात बंदी निर्णय मागे घेणे आवश्यक आहे. 
गेल्या काही दिवसांत झालेले शेतकऱ्यांचे झालेले  नुकसान भरून द्यावे,कारण उत्पादन खर्च पण मिळत नाहीये अशी परिस्थिती आहे.शेतकरी विधेयकात शिवार खरेदी करताना शेतकऱ्याला आर्थिक संरक्षणाची तसेच किमान आधारभूत किमतीची  mhp याबाबत कायद्यांत अंतर्भाव व्हावा .निर्यात बंदी रद्द झाले शेतकरी विधेयकात शेतकऱयांना संरक्षण शेतकऱ्याला संरक्षण न मिळाल्यास महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे जनआंदोलन हाती घेण्यात येईल . 
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी शेतकरी मी शेतकऱ्यांचा मुलगा असून शेतकऱयांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील केंद्र आणि राज्य संस्थांकडे पाठपुरावा करेल अशी भावनिक साद यावेळी शिष्टमंडळाला दिली .
 या भावना राज्यपाल यांच्यापुढे व्यक्त केल्या.यावेळी शिष्टमंडळात  शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब बच्छाव,योगेश रायते,राम निकम,मनोज भारती दीपक भदाणे,विनायक पवार,उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *