Headlines

बार्शीतील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन, रेमडीसिव्हिर इंजेक्‍शन वाढवून द्या –भाकप

 


बार्शीतील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन, रेमडीसिव्हिर  इंजेक्‍शन  वाढवून द्या –भाकप

 

 बार्शी /प्रतिनिधी बार्शी तालूक्‍यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन , रेमडीसिव्हिर  इंजेक्‍शन व कोरोना लसीचे दोन्ही डोस वाढवून देण्‍याची मागणी भारतीय कम्‍युनिस्‍ट पक्षाच्‍या वतीने मा. जिल्‍हाधिकारी यांच्‍या कडे करण्‍यात आली आहे.  ई-मेल द्वारे मा.मुख्‍यमंत्री व मा. तहसिलदार बार्शी  यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

 

निवेदनात म्‍हणले आहे, बार्शी तालूका हा उस्मानाबाद व सोलापूर जिल्हयातील काही तालूक्यांच्या जवळचा आहे.  बार्शीत दवाखान्याची संख्या जास्त आहे. त्यामूळे सर्वच ठिकाणचे रुग्ण येथे येतात . बार्शी तालूक्‍यातील वाढणारे कोरोनाचे रुग्ण व बाहेरील रुग्ण असा दुहेरी ताण आहे. बार्शीत मृतांची संख्या देखील जास्त आहे. अशा परस्थितीत बार्शी तालूक्याचे लोकप्रतिनीधी मा. आमदार यांनी कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन, रेमडीसिव्हिर  इंजेक्शन व कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस वाढवून मिळणे गरजेचे झाले, असल्याच्या मुद्या उपस्थित केला होता. त्या मुद्यांचे भारतीय कम्युनिस्‍ट पक्ष समर्थन करतो . बार्शी तालूक्या साठी तातडीने ऑक्सिजन साठा, रेमडीसिव्हिर  इंजेक्‍शनचा  कोटा व  कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस यांचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली आहे. 

 

कोरोना लसीकरणाच्या  ठिकाणी  गैरसोय होत असल्याने एक लस घेण्यासाठी तीनठिकाणी नोंदणी करावी लागत आहे.  यामुळे लसीकरणावेळी गर्दी व गोंधळाचे वातावरण तयार होते आहे. यावर तातडीने प्रशासनाने उपाययोजना कराव्यात ही मागणी देखील केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *