Headlines

“पांडुरंग’च्या सभासदांना मिळाले “निडवा” ऊसाला प्रतिटन 100 रुपयांचे अनुदान

  • पांडुरंग साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी गळीत हंगाम 2019-20 मध्ये ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निडवा ऊस ठेवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. निडवा ऊस ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा आंतर मशागतीवरील खर्च कमी होतो तसेच दुष्काळी परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यास कमी पाण्यामध्ये उत्पन्न मिळेल हा विचार करून ही योजना राबविण्यात आली होती. या योजनेमुळे कारखान्याच्या गळीत हंगाम 2019-20 मध्ये गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी मदत झाली.

पंढरपूर/नामदेव लकडे ::-  श्री  पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामात गाळप केलेल्या निडवा उसाचे प्रतिटन शंभर रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याच्या वतीने सुपंत जिवाणू खतांचे उधारीने वाटप करणार असून, ऊस विकास दिनदर्शिकेचे मोफत वाटप करणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.कारखान्याचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी गळीत हंगाम 2019-20 मध्ये ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निडवा ऊस ठेवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. 

निडवा ऊस ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा आंतर मशागतीवरील खर्च कमी होतो तसेच दुष्काळी परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यास कमी पाण्यामध्ये उत्पन्न मिळेल हा विचार करून ही योजना राबविण्यात आली होती. या योजनेमुळे कारखान्याच्या गळीत हंगाम 2019-20 मध्ये गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी मदत झाली. निडवा उसाला प्रतिटन शंभर रुपये अनुदान देण्याचे आश्वासन श्री. परिचारक यांनी दिले होते. त्यानुसार निडवा अनुदानाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. गळीत हंगाम 2020-21 च्या तयारीची कारखान्यामधील कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना ऊस पिकाकरिता गट ऑफिसच्या ठिकाणी ‘सुपंत’ जिवाणू खते उधारीने उपलब्ध करून दिली आहेत. 
ऊस उत्पादन वाढीकरिता आवश्‍यक असणारी माहितीपूर्ण ऊस विकास दिनदर्शिका शेतकऱ्यांना घरपोच देण्यात येत आहे. चालू हंगामासाठी तोडणी वाहतुकीचे करार झालेले असून, कारखान्याने प्रत्येक वाहन टोळीला दोन लाख रुपये पहिल्या ऍडव्हान्स हप्त्याचे वाटप केले आहे. त्यामुळे ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणाही सज्ज होऊ लागली आहे, असे श्री. कुलकर्णी यांनी नमूद केले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष श्री. परिचारक, उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. कारखाना व्यवस्थापनाने हंगाम 2019-20 मध्ये गाळप केलेल्या उसाचे 100 रुपयाचे निडवा अनुदान, सुपंत दिनदर्शिका, सुपंत जिवाणू खते देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासले असून, पुढील गाळप हंगाम 2020-21 मध्ये कारखान्याने ठेवलेले ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्‍चित पूर्ण होईल, असेही डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी या वेळी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *