Headlines

पंढरपूरमध्ये मोफत पोलीस भरती सेमिनार

प्रतींनिधी/ रविशंकर जमदाडे– पंढरपूरमध्ये अल्पावधीतच स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अग्रेसर ठरलेली ज्ञानक्रांती अकॅडमीच्या वतीने, महाराष्ट्र शासनाच्या वतीने  घेण्यात येणाऱ्या आगामी पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी दोन दिवसांच्या सेमिनारचे आयोजन करण्यात आले असून, शनिवार  दिनांक 17 ऑक्टोबर व 18 ऑक्टोबर 2020 या दोन दिवशी हे सेमिनार सोशल डिस्टन्सचे नियम पाळून पार पडतील. या सेमीनारला मार्गदर्शक म्हणून, मा. संजय लोखंडे ( PSI ) व प्रा. नवनाथ गोडसे हे मार्गदर्शन करतील. यामध्ये पोलीस भरतीच्या पूर्वतयारी मधील सर्व घटकांची व्यवस्थित माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल, तरी या सेमिनारचा पोलीस भरती तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन अकॅडमीच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *