Headlines

तांदुळवाडी येथील कुटूंबाला अर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे वाटप. वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत राबविला अनोखा उपक्रम

रिधोरे  : :-  तांदुळवाडी येथील जिव्हाळा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष श्री.श्रीकांत भोसले यांची मुलगी कु.सई श्रीकांत भोसले हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तसेच वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत आयुष्य मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी सुचवलेले अर्सेनिक अल्बम-30 या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे सुमारे 830 लोकांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुतीबप्पा भोसले होते.

लोकांनी सोशल डिस्टेसिंगचे पालन करत आपण स्वतःला तसेच इतरांनाही कोरोनाच्या संकटापासून वाचविले पाहिजे कोरोनाने आता ग्रामीण भागात शिरकाव केल्याने जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे असल्याचे उपसरपंच राजाभाऊ शिंदे यांनी सांगितले.तसेच गावातील राजकीय मतभेद विसरुन आपल्या गावाच्या विकासासाठी व कोरोनासारख्या संकटाचा सर्वांनी एकत्र येऊन सामना करुन योग्य ती खबरदारी घेऊन स्वतःला तसेच इतरांनाही कोरोनाच्या संकटापासून वाचविणे गरजेचे असल्याचे प्रमोद भोसले यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी सरपंच सौ.अनिता भोसले, उपसरपंच राजाभाऊ शिंदे,माजी सरपंच प्रमोद भोसले,रणजित पाटील,अण्णा जाधव,दत्ताआबा गवळी,चांगदेव भोसले,इंद्रजीत भोसले, दत्ताआबा कदम,विष्णू अनपट,संभाजी ब्रिगेडचे शांतीलाल गवळी तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी माने,उपाध्यक्ष श्रीकांत भोसले,सदस्य सुमंत गवळी,दिपक गवळी, प्रकाश कदम सौ.रेश्मा भोसले,विद्या गवळी,भगिरथी रगडे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अतुल गवळी यांनी तर शिवाजी माने यांनी आभार मानले.कार्यक्रम सोशलडिस्टन्स चे पालन करून करण्यात आला कार्यक्रमाला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *