Headlines

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : शांतता अधिक प्रिय असेल. सारासार विचार करूनच कृती करा. संयम सोडून चालणार नाही. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. 


2. वृषभ : मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. संमिश्र घटनांचा दिवस. हातातील कला सादर करता येईल. कौशल्याच्या जोरावर कामे कराल. 

3. मिथुन : कामाला चांगला वेग येईल. काही क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल.

4. कर्क : चिडचिड न करता कामाला गती द्या. व्यापारातून चांगला लाभ होईल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. वैवाहिक जीवन सुखकर राहील.

5. सिंह : आत्मविश्वास कायम ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो. मनाच्या चंचलतेला आवर घाला. वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्या. 

6. कन्या : आपले बोलणे मधाळ ठेवावे. योग्य तर्क लावाल. समोरच्याचा रोख ओळखून वागावे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. 
7. तूळ : स्वत:मध्येच रमण्यात वेळ जाईल. कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच उत्तर द्या. तिखट पदार्थ खाणे टाळावे. मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. 

8. वृश्चिक : पोटाचे आरोग्य सांभाळावे. लोक तुमचा सल्ला ऐकतील. गरजूंना मदत कराल. परोपकाराची संधी मिळेल. संशयी वृत्तीला आळा घाला.

9. धनु : घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. 

10. मकर : स्वत:च्याच आनंदात रममाण व्हाल. जवळचा प्रवास कराल. मित्रांची गाठ पडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. 

11. कुंभ : जुन्या विचारात गुंतून राहू नका. आवडी बाबत दक्ष राहाल. करमणुकीत वेळ घालवाल. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल.

12. मीन : आपला संयम सुटू देऊ नका. घराबाहेर प्रतिष्ठा लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. नवीन सुरुवात दिलासादायक असेल. 

 6 सप्टेंबर 2020 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *