Headlines

चंदनवाडी गावामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

प्रतीनिधी / बीड – भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या नियमानुसार भारताच्या स्वातंत्र्यानंतर विद्यार्थ्यांनविना ध्वजारोहण सोहळा प्रथमच साजरा झाला. ध्वजारोहण झाल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात व सीमेवर दहशतवाद्यांशी लढा देताना शहीद झालेल्या जवानांना तसेच कोरोणा विरुद्ध लढ्यात मृत्यू पावलेल्या डॉक्टर, पोलीस कर्मचाऱ्यांना देखील श्रद्धांजली वाहिली व ध्वजारोहण करून कार्यक्रम पूर्ण झाला. यामध्ये चंदनवाडी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण सरपंच श्रीमती सिंधूताई रामभाऊ गित्ते यांच्या हस्ते झाले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनवाडी येथील ध्वजारोहण covid-19 योध्या व गावच्या आशा  सेविका श्रीमती जनाताई मोठेराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, पालक, सरपंच, उपसरपंच, शिक्षक वृंद व मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *