Headlines

गोदुताई विडी घरकुल येथे वृक्षारोपण

सोलापूर /शाम आडम – पद्मशाली इंटरनॅशनल फाउंडेशन सोलापूर ईस्ट क्लब, सोलापूर MIDC क्लब, व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने गोदुताई विडी घरकुल येथे वृक्षारोपण करण्यात सदर कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर केला. 
सदर कार्यक्रमास गोदुताई विडी घरकुलचे मुख्य प्रभारी कॉ.विल्यम ससाणे,कॉ.बापू साबळे,अप्पाशा चांगले DYFI चे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, SFI चे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.  या प्रसंगी PIF सोलापूर ईस्ट क्लबचे अध्यक्ष हरिदास पेंटा, खजिनदार नीलकंठ दोरनाल, सोलापूर MIDC क्लबचे अध्यक्ष प्रविण सग्गम, सचिव उमाकांत माकम,  सोलापूर ह्युमॅनिटी क्लबचे अध्यक्ष रविकुमार चन्ना, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य राजू तुम्मा व क्लबचे इतर सदस्य हे उपस्थित होते. 
पद्मशाली इंटरनॅशनल फाउंडेशन सोलापूर ईस्ट क्लब, सोलापूर MIDC क्लब व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीने दि.२८/६/२०२० पासून वृक्षारोपण अभियान सुरू झाले. या अभियानाअंतर्गत सोलापूरच्या विविध भागात पुढील काही आठवडे दर रविवारी वृक्षारोपण करण्यात येत आहे.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबादास कटकम, मधुकर रापेल्ली, शामसुंदर आडम,विजय हरसुरे, प्रशांत आडम, यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *