Headlines

खेडभोसे ग्रामस्थांच्या वतीने डॉ.होनराव यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार

पंढरपूर/नामदेव लकडे –खेडभोसे ग्रामस्थ यांचे वतीने पशुवौद्यकीय डॉ.होनराव यांचा सत्कार उपसरपंच सिध्देश्वर पाटील यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी माजी पोलिस पाटील अंकुश पाटील,खेडभोसे सोसायटीचे माजी चेअरमन अशोक पवार, सहकार शिरोमणीचे मा.कामगार संचालक बंडु पवार,मनसेचे तालुका उपप्रमुख हेमंत पवार, हरिदास पाटील, सोसायटीचे व्हा.चेअरमन विकास पवार, पशुवौद्यकीय डॉ.अजित साळूंखे, संजीवनी मेडीकल मनोज माने,माजी सरपंच उध्दव भोसले,गणेश दिक्षित उपस्थित होते.डॉ.होनराव यांनी करकंब येथे 10 वर्षे सेवा, पटवर्धन कुरोली येथे 5 वर्षे असे 25 वर्षाच्या नोकरीत पंढरपूर तालुक्यात सेवा केली. यांचे मुळ गांव सांगोला तालुक्यात असून त्यांनी पुर्ण सेवा पंढरपूर तालुक्यात केली. अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे खेडभोसे गामस्थांशी संबंध आहे. या कार्यक्रमाचे नियोजन संजीवनी मेडीकल मनोज माने व डॉ.अजित साळूंखे, यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *