Headlines

कुंडल परिसरात कंटेंनमेंट झोनसह पूर्ण गावात सोडियम हायप्रोक्लोराईड फवारणी

   रणसंग्राम सोशल फौंडेशन कडून फवारणी
  कोरोना पार्श्वभूमीवर रणसंग्राम फौंडेशनकडून  फवारणी पथकाची स्थापना

सांगली / पलूस ::- कुंडल येथे रिंग रोड कंटेंनमेन्ट झोन परिसरात ट्रॅक्टर फवारणी यंत्रा द्वारे सोडियम हायप्रोक्लोराईड फवारणी करण्यात आली.. यावेळी मुख्य बाजार पेठ सह, शिक्षक कॉलनी, व ब्लॉक एरिया,मधील प्रत्येक गल्लीत ट्रॅक्टर द्वारा फवारणी करण्यात आली, सावित्रीबाई फुले नगर सह कुंडल पोलीस स्टेशन येथे रणसंग्राम च्या स्वयंसेवकांनी उपस्थित राहुन फवारणी करून घेतली. फवारणीसाठी रणसंग्राम चे स्वयंसेवक विशाल कोंढाळकर,हनीफ शेख, सचिन शिंदे, विनायक दिवटे, अक्षय कांबळे, अवधूत परळे, ऋतिक कोळेकर, रोहन कासार यांनी परिश्रम घेतले.
यावेळी फौंडेशन कडून असे  कळविण्यात.निर्जंतुक फवारणी साठी मागणी असेल अशा ठिकाणी रणसंग्राम चे स्वयंसेवक स्वतःचे फवारणी यंत्रणा, व औषधासहित येऊन फवारणी करून जातात, कोरोना पार्श्वभूमीवर रणसंग्राम विविध पातळीवर कार्य करीत असून निर्जंतुक फवारणी साठी मीच माझा रक्षक हे फौंडेशन द्वारा  फवारणी पथक स्थापन केले, कुंडल सह आजूबाजूच्या गावात स्वयंसेवक फवारणी करत आहेत. फवारणी करणारे शिलेदार राष्ट्रभावनेने प्रेरित झालेले असूनस्वतःची सुरक्षा घेत परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करून दिली जाते असे रणसंग्राम सोशल फौंडेशन चे संघटक, व अँटी कोरोना टास्क फोर्स चे कुंडल शहर प्रमुख श्री शिवाजी रावळ यांनी सांगितले. परिसरातील सामाजिक संघटना, युवा मंच, गणेश उत्सव, नवरात्र, व सांस्कृतिक, क्रीडा मंडळानी देखील कृतीयुक्त काम करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन  अँड दिपक लाड यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *