Headlines

कारी शिवारातील वस्त्या झाल्या प्रकाशित

प्रतिनिधी(असिफ मुलाणी)-सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.सोलापूर व उस्मानाबाद मध्येही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. लॉकडाउन मुळे नागरीक घरातून बाहेर पडताना दिसत नाहीत.कोरोना च्या भीतीने ग्रामीण भागातील कुटुंब आपल्या शेतात राहावयास गेलेली आहेत.शेतात राहणाऱ्या कुटूंबाना वीज , रस्ते पाणी अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
कारी गावातील काही कुटूंब कोरोनाचा भीतीने आपापल्या शेतात राहावयास गेली आहेत.शेतात थ्री फेज कनेक्शन आहेत.ह्याची वेळ संध्याकाळी 6 ते सकाळी 8 आहे.वस्तीवर व शेतात राहणाऱ्या लोकांना सिंगल फेज कनेक्शन नसल्यामुळे अनेक अडचणी चा सामना करावा लागत होता.
गावातील अनेक लोकांनी महावितरण कडे सिंगल फेज सुरू करण्याची मागणी केली होती.शेतकऱ्याच्या ह्या मागणीला यश आले असून शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपासून सिंगल फेज लाईन सुरू करण्यात आली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे.

यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे अमोल जाधव, डॉ देवेंद्र डोके,व्हटकरसाहेब, विद्यूत सहाय्यक अभिजित कोळी,ऑपरेटर भोसले,निखिल हाजगुडे, राहुल पखाले, विकास गादेकर,बापू काळे, परीक्षित विधाते, नामदेव हाजगुडे,आसिफ मुलाणी ,परीक्षित हाजगुडे, विजय गाडेकर,आबा सारंग ,शेतकरीआदी उपस्थित होते.

कायमस्वरूपी किंवा कोरोनामूळे  शेतात वाडी- वस्तीवर राहणारे जे कुटूंब आहेत त्यांची रात्री अपरात्री विजेअभावी  हेळसांड होत होती. नाग, जंगली प्राणी यांपासून होणारा त्रास  सिंगलफेज मूळे फार कमी होणार आहे.अशी प्रतिक्रिया उमेश सारंग या शेतकऱ्यांने दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *