Headlines

‘कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन’ या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांची मुलाखत

[ad_1]

मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा कांदळवन कक्षाचे प्रमुख वीरेंद्र तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या अॅपवर गुरुवार दि. १६, शुक्रवार दि. १७ आणि शनिवार दि. १८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणावर कांदळवन असून जैवविविधतेच्या दृष्टीने ही कांदळवने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. किनाऱ्यांची सुरक्षितता राखण्यासाठीही कांदळवने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कांदळवनाचे पर्यावरणीय महत्त्व, कांदळवनाचे व्यवस्थापन, संरक्षण व संवर्धन कशाप्रकारे केले जात आहे तसेच कांदळवन कक्षाच्या कामगिरीविषयीची सविस्तर माहिती श्री.तिवारी यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

००००

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *