ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I
वयात येता पाळी ही येई मातृचक्राची सुरुवात होई
सुरुवात होता
तू घाबरायचं नाही
MHM चे लय महत्व बाईI१I
पाळी ही येता त्रास
होईल ओटी पोटी दुखणे
तुला जाणवेल
आहार चौरस सुरु ठेव ताई
MHM चे लय महत्व बाई I2I
मिठाचा वापर कमी तू कर ग कच्च्या भाज्या आणि
फळे तू खा ग निरोगी
राहण्याची ही चावी ताई
MHM चे लय महत्व बाईI3I
चिडचिड होईल भीती ही
वाटेल गोंधळ होईल
राग तुला येईल
यामुळे घाबरून जायचे नाही MHM चे लय महत्व बाई I४I
थकवा वाटेल ,ताण तुला येईल निराश वाटेल चिडचिड होईल
यामुळे गोंधळून जायाचे नाही MHM चे लय महत्व बाई I५I
सुर्यनमस्काराचा आधार घे ग दीर्घ श्वासाचा व्यायाम कर ग
त्या चार दिवस
आरामाची हि चावी बाई
MHM चे लय महत्व बाई I६I
थोडासा व्यायाम रोज तू कर ग स्वताची काळजी स्वता तू घे ग
स्वतासाठी थोडा वेळ दे ग ताई एमएचएम चे लय महत्व बाई I७I
सँनिटरी पँडचा वापर तू कर ग दिवसातून चार वेळा बदल तू कर ग
पाळीचा कालावधी सुखकर होई एमएचएम चे लय महत्व बाई I८I
सुती कपड्याचा वापर कर ग भिजलेले कपडे नियमित बदल ग
पाळी व्यवस्थापन सोपे हे होई एमएचएम चे लय महत्व बाई I९I
आनंद तुझ्या घरात नांदो हे चार दिवस सुखाचे जावो
उमेद तुझ्या जीवनात राही एमएचएम चे लय महत्व बाई I१०I
https://absnewsofficial.blogspot.com/2020/05/Poojadatta.html
https://absnewsofficial.blogspot.com/2020/05/Masik.html
गीतकार – गुरु भांगे
जिल्हा कृतीसंगम समन्वयक , महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मो – ८८८८४२१६६६