Headlines

आदिवासी पाड्यातील महिलांसोबत दिवाळी साजरी


विशेष प्रतींनिधी/ठाणे –आदिवासी जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज रविवार दि.15/11/2020 रोजी ठाणे जिल्ह्यातील आसनगाव पाडा येथे आदिवासी समन्वय समितीतर्फे आदिवासी महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.महिलांना रोजगारविषयक माहिती देऊन विविध प्रशिक्षणांची माहिती देण्यात आली.यावेळी भूमिहीन, विधवा व निराधार आदिवासी महिलांना दिवाळीचा फराळ,साडी आणि आरोग्यहितासाठी मास्कचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आदिवासी समन्वय समितीचे राज्य संपर्क प्रमुख श्री.मधुकर हरी गभाले आणि त्यांच्या सहका-यांनी विशेष परिश्रम घेतले.ज्योती दिपक ठाकरेअध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा),महिला आर्थिक विकास महा मंडळ, उद्योजिका आणि वुमन पाॅवर असोसिएशनच्या अध्यक्ष श्रीमती अर्चना शर्मा,शिवसेनेच्या जि.संघटक आणि नवचेतना महिला महासंघाच्या अध्यक्ष रश्मीताई निमसे,WTCचे मानद सल्लागार श्री.जयेश खाडे,IIT मुंबईचे श्री.मलय घोष आणि MCED ठाणेचे प्रतिनिधी मनोज भोईर,वासिंद शहर आध्यक्ष आनंद गायकवाड,आजय बांगर,पारधी सर यांच्यासोबतच राष्ट्रवादी काॅग्रेसचे मुंबईचे पदाधिकारी व उद्योजक श्री.किशनराव गायकवाड उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माविम शहापूरच्या व्यवस्थापिका श्रीमती रंजना सातपूते यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *