Headlines

अडववेला शेतरस्ता खुला करण्याची शेतकर्‍यांची मागणी

मारापूर ता.26- मंगळवेढा तालुक्यातील मारापुर येथील जानकर वस्ती ते खडकरी ओढा हा पूर्वीपासून चा दक्षिण उत्तर चालीच्या रस्त्याचे काम लोकसहभागातून सुरू होते.काही शेतकऱ्यांनी जाणून बुजून रस्ता अडवला असून तो रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी चे निवेदन तहसीलदार यांच्याकडे विठ्ठल दिगंबर यादव व इतर शेतकऱ्यांनी केला आहे .याबाबत या शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की दक्षिण उत्तर चालीचा हा अकोला- घरनिकी रस्त्याला जोडणारा रस्ता बारा फूट गाडीवाट पाय वाटेने रस्ता पूर्वीपासून चालत चालला असून आमचे लगतचे असणारे शेतकरी यांनी जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने पूर्वीपासून चालू असलेला रस्ता पंधरा दिवसापासून आलेला आहे .

सदर रस्ता गावातील काही शेतकरी व दानशूर व्यक्तींच्या सहभागातून शेतीसाठी पोळ्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी जाण्यासाठी हा रस्ता मुरमीकरण करून दिले आहेत . सदर रस्त्याचे नोंद ग्रामपंचायत ऑफिस मध्ये असताना देखील हा रस्ता असल्यामुळे शाळेला जाणार येणाऱ्या मुलांची भविष्यात अडचण निर्माण होणार आहे तसेच खरीप व रब्बी हंगामात ओढ्याला पाणी आल्यामुळे पिके लागवड चालू आहे अशा वेळी शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता काढल्यामुळे पर्याय रस्ता नसल्यामुळे पिकांचे व शेतीमालाचे नुकसान होता होणार आहे तरी याबाबत विचार करून प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून पूर्वीपासून चालत आलेला रस्ता खुला करून मिळावा अशी मागणी निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर संतोष यादव ,अमोल(माने)पाटील ,मारुती पाटील ,विक्रम यादव(माजी तंटामुक्त अध्यक्ष),सिद्धेश्वर यादव, गणेश यादव,पंढरिनाथ यादव, लक्ष्मण यादव, परमेश्वर यादव, विनोद यादव, अलका यादव, नागनाथ यादव, सारिका माने, यांच्या सह्या आहेत.

चांगल्या प्रकारे पाऊस पडला आहे. शेतीच्या कामाची लगबग चालु झाली आहे. शेताकडे जाण्यासाठी रस्ता खुला करून ग्रामस्थांनं चा होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे. – राजकुमार यादव , मारापुर, ग्रामस्थ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *