Headlines

अंनिसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी कॉ. तानाजी ठोंबरे तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून विनायक माळी यांची निवड

सोलापूर – शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची ऑनलाईन बैठक पार पडली.या बैठकीस सोलापूर, बार्शी, सांगोला,कुर्ड्वाडी,माळीनगर व करमाळा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत सर्वानुमते कार्यकारणी निवडली गेली.

त्यांमध्ये अंनिसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कॉ. तानाजी ठोंबरे(बार्शी),जिल्हाकार्याध्यक्ष म्हणून विनायक माळी (बार्शी)यांची निवड करण्यात आली.जिल्हाउपाध्यक्ष म्हणून प्राचार्या दीपाताई सावळे(बार्शी) तर जिल्हा सचिव म्हणून डॉ.राजेंद्र सूर्यवंशी (सांगोला) यांची निवड केली गेली.

मअंनिसच्या विविध विभागाचे कार्यवाह म्हणून खालील निवडी केल्या. यशवंत फडतरे(सोलापूर) -बुवाबाजी संघर्ष विभाग ,प्रा.गिरीष ढोक (माळीनगर )-वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प ,अंजली नानल(सोलापूर)सत्यभामा जाधवर (बार्शी) –महिला विभाग, दत्तात्रय खंडेराव(सोलापूर) -विविध उपक्रम,सरिता मोकाशी (सोलापूर)– जातनिर्मूलन व जोडीदाराची विवेकी निवड, डॉ.सीमा गायकवाड (सांगोला) सोमनाथ वेदपाठक (बार्शी)–युवा व विवेकवाहिनी, विजय माने (सांगोला)विठ्ठलराव वठारे (सोलापूर) –सोशल मेडिया, डॉ.सुरेश व्यवहारे (सोलापूर)– मानसिक आरोग्य,काकासाहेब गुंड (बार्शी)–कायदेशीर सल्लागार,श्रीमती सुजाता पाटील (सांगोला) — सांस्कृतिक विभाग, डॉ.एस.के.पाटील(सांगोला)–वार्तापत्र व निधी संकलन, कॉ.रवींद्र मोकाशी(सोलापूर),डॉ.प्रभाकर माळी( सांगोला),डॉ.नभा काकडे (सोलापूर) डॉ.जम्मा (सोलापूर) यांची जिल्हा सल्लागार म्हणून निवड झाली.
*तसेच जिल्ह्यातून राज्यकार्यकारीनी सदस्य म्हणून प्रा.डॉ.अशोक कदम(बार्शी) राज्य सल्लागार म्हणून निशाताई भोसले (सोलापूर) व प्रा. हेमंत शिंदे ( बार्शी) यांची नियुक्ती झाली आहे.

राज्य कार्यकारीनी सदस्य मुक्ता दाभोळकर व हमीद दाभोळकर यांनी या सर्व नूतन जिल्हाकार्यकारीनीच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा जिल्हा बैठकीत मनोगत व्यक्त करून दिल्या.बैठकीचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अशोक कदम तर प्रास्ताविक निशाताई भोसले व आभार प्रदर्शन विनायक माळी यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *