🪀 आता WhatsApp वरील chats Telegram वर मूव्ह करता येणार; कसं ते घ्या जाणून!

🧐 युजर्स WhatsApp बंद करुन Signal किंवा Telegram शिफ्ट होत आहेत परंतु त्यापैकी काहींना त्यांचे चॅट्स गमावण्याची भीती आहे. 


🤷🏻‍♂️ अशा युजर्सना दिलासा देणारी बातमी आहे. कारण आता तुम्ही तुमचे WhatsApp chats Telegram वर मूव्ह करु शकता. 


💁🏻‍♂️ टेलिग्रामवर चॅट असं एक्सपोर्ट करा –


▪️तुम्ही जर Android फोन वापरत असाल तर सर्वात आधी तुम्ही WhatsApp चॅट ओपन करा.


▪️कोपऱ्यात तीन डॉट्स असलेला एक पर्याय आहे त्यावर क्लिक करा.


▪️तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर दिसणाऱ्या पर्यायांपैकी More या पर्यायावर क्लिक करा.


▪️आता तुम्हाला एक्सपोर्ट चॅट असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.


👉 एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर शेअर मेनू ओपन होईल. त्यामध्ये टेलिग्रामची निवड करा.


📍दरम्यान, महत्वाची बाब म्हणजे जेव्हा तुम्ही मीडिया फाईल्स WhatsApp वरुन Telegram वर मूव्ह कराल तेव्हा टेलिग्राम त्यासाठी एक्स्ट्रा स्पेस घेणार नाही.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply