🎮 बहुप्रतिक्षित स्वदेशी FAU-G गेम अखेर लॉन्च; फीचर्स आणि डाउनलोड बद्दल जाणून घ्या!

👨🏻‍✈️ चायनीज PUBG गेम ने लहानांपासुन मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला वेड लावले होते. चायनीज ॲप्स सरकारने बंद केल्यानंतर PUBG सुद्धा हद्दपार करण्यात आला. 

🧐 PUBG सारखा दुसरा कोणता गेम बाजारात आणता येईल, ज्याला तेवढाच प्रतिसाद लोकांकडून मिळेल असा विचार या क्षेत्रातील मंडळी करत होती. 

👌🏻अक्षय कुमारने नुकतीच फौजी गेम ची घोषणा केली होती. प्रजासत्ताक दिनाचे मुहूर्त साधून  आज मेड इन इंडिया मल्टी-प्लेअर मोबाइल गेम FAU-G (Fearless and United Guards) अखेर लाँच करण्यात आला आहे. 

ℹ️ हा गेम आजपासून प्ले-स्टोअरवर उपलब्ध झाला असून हा गेम अँड्रॉइड युजर्स तिथून डाउनलोड करु शकतात. 

📌 भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG भारतात बॅन करण्यात आला होता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

FAU-G कसा डाऊनलोड कराल?

1. सर्वात आधी गुगल प्ले स्टोर ओपन करा.

2. FAU-G असे सर्च करा.

3. त्यानंतर सर्च रिझल्ट्स दिसतील. त्यामधील पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावरच FAU-G असेल, त्यावर क्लिक करा.

4. गुगल प्ले स्टोरवर गेम इन्स्टॉल करण्यासाठीचे पेज ओपन होईल.

5. इन्स्टॉलचे बटण युजर्सना तेव्हाच दिसेल, जेव्हा कंपनीकडून गेम लाईव्ह केला जाईल.

6. ज्या युजर्सनी या गेमसाठी आधीच प्री-रजिस्ट्रेशन केलेले आहे, त्यांना गेम लाईव्ह होताच पुश नोटिफिकेशन पाठवले जाईल.

7. नोटिफिकेशनवर क्लिक करताच युजर्स थेट इन्स्टॉलेशन पेजवर जातील. युजर्स त्याद्वारे गेम इन्स्टॉल करु शकतात.

Leave a Reply