Breaking News

१४० क्रमांकाबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही

अनोळखी व्यक्तींना बँक अकाऊंट, क्रेडिट,डेबिट कार्डची माहिती न देण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

मुंबई –  मोबाईलवर १४० या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसिव्ह केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे  काढले जाऊन अकाउंट शून्य होते अशा आशयाच्या समाजमाध्यमांवर व्हायरल संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही, मात्र कोणताही कॉल आल्यास बँक अकाउंटबाबत  आपली वैयक्तिक माहिती देऊ नये असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’ने केले आहे.

जोपर्यंत आपण बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा  क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड चे पूर्ण नंबर तसेच  सीव्हीव्ही किंवा पिन  शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही.

जर आपणास 140 ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरु नये/ पॅनिक होऊ नये.  हे क्रमांक टेलिमार्केटिंगकरिता दिले गेलेले असतात.  परंतु हे देखील लक्षात ठेवावे की, अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास व ओटीपीसह आपली वैयक्तिक माहिती,  बँक डिटेल्स, डेबिट/ क्रेडिट  कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल  तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट/ क्रेडिट कार्डची माहिती  अथवा पिन नंबर/ ओटीपी देऊ नये  अथवा दिला जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन ‘महाराष्ट्र  सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!