AarogyaBreaking News

हजरत सुब्हानी मेमोरियल ट्रस्ट व श्री रत्ना बहुउद्देशीय सेवा संस्था तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सांगली/सूहेल सय्यद

सांगली जिल्ह्यातील मिरज मध्ये शाहि ईदगाह येथे हजरत सुब्हानी मेमोरियल ट्रस्ट यांचे सुब्हानी क्लिनिक व श्री रत्ना बहुउद्देशीय सेवा संस्था यांचे श्री रत्ना मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्यावतीने सर्वरोग निदान मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन महात्मा गांधी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कांबळे, नगरसेवक संदीप आवटी, व सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांच्या हस्ते झाले.

     आरोग्य शिबिरामध्ये 300 रुग्णांची तपासणी करण्यात आली व पुढील उपचार सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. डॉ.गुरु बगली व डॉ. मोहम्मद उस्मान अली यांनी रुग्णांची तपासणी करून केले मोफत औषधे दिले.

     यावेळी संजय देशींने, संतोष बामने, उमेश पवार, राम बिरादार, सामाजिक कार्यकर्ते महबूब आली मणेर, नजीर झारी, निहाल मनेर, मुक्ती सुफियान, तोहिद मोमीन, युनुस शेख ,हसन मोमीन ,शब्बीर मोमीन ,आसिफ मनेर ,जाफर  पिरजादे, सलीम मलिक , नूरज़हाभाभी मनेर, डॉ.आलासे व डॉ.युनुस मंगळवारे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!