स्वंयसेवी संस्थांच्या वतीने कोवीड -19 जनजागृती व सँनीटायझर वाटप उपक्रम

जालना /विशेष प्रतिनिधी -धृती फाउंडेशन मुंबई,सहारा सामाजिक विकास संस्था,चांदई ठोंबरी व तेजस जनविकास विकास संस्था ,चनेगाव यांच्या सयुंक्त सहकार्याने  जालना जिल्ह्यातील विविध शासकीय,निमशासकीय  कार्यालय व धार्मिक ठिकाणी मोफत सँनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. यासाठी  धृती फाऊंडेशन चे गोपाल वासुदेव, राधिका वासुदेव,राजेश मिश्रा,गोपाल देवकर  यांनी   मार्गदर्शन व सहकार्य केले . 

तेजस जनविकास संस्था चनेगाव ता.बदनापुर जिल्हा जालना, सहारा सामाजिक विकास संस्था चांदई ठोंबरी व आधार सेवाभावी संस्था वाटुर  यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ,  पोलिस अधिक्षक कार्यालय जालना या सोबत च राजुर गणपती संस्थान,शिवशक्ती आश्रम तुपेवाडी, जेतवन बुद्ध विहार डोंगरगाव,ग्रामीण रुग्णालय,राजुर ,प्राथमिक आरोग्य केंद्र ,दाभाडी,बँक अॉफ इंडिया शाखा.राजुर ,पोलिस चौकी राजुर,उमेद महिला  ग्राम संघ,यांना  प्रत्येकी  पाच लिटर सेनिटायझर व मास्क वाटप करुन कोराना आजाराच्या  प्रादुर्भावापासून सुरक्षित रहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली. यावेळी  जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे,डॉ.प्रशात वाडीकर, राजुरेश्वर संस्थानचे प्रशासकीय अधिक्षक प्रशांत दानवे,शिवशक्ती आश्रम चे खडेश्वरी बाबाजी,जेतवन बुद्ध विहार चे भन्ते मनायु यांनी तेजस जनविकास संस्थेचे  शिवाजी तायडे व सहारा सामाजिक विकास  संस्थेचे  बि.एस.सय्यद यांचे कौतुक केले.सध्याच्या परिस्थिती मध्ये कोराना आजार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्व नागरिकांनी स्वतःची व कुंटूबाची काळजी घेण्यासाठी संस्था च्या वतीने आवाहन  करण्यात येत आहे.पुढील काळात संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक संस्था ,संघटना च्या सहकार्याने जन जागृती मोहिम राबविण्यात येणार  आहे अशी माहिती बी.एस.सय्यद व शिवाजी तायडे यांनी दिली.

Leave a Reply