सर्व नागरिकांनी प्रधानमंञी जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा उतरवावा – गणेश अधटराव

पंढरपूर/नामदेव लकडे ::- सर्व नागरिकांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रत्येक नागरिकांच्या फॅमिली आधाराकरिता कमीत कमी रक्कमेत सर्वांनकरिता त्यांच्या संकल्पनेतुन सुरू असलेल्या वार्षिक रक्कम 330 रू. असलेला प्रधानमंञी जीवन ज्योती विमा व वार्षिक रक्कम 12 रूपये असलेला प्रधानमंञी सुरक्षा विमा हा आपले नॅशनल बँक खाते असलेल्या बँकेमध्ये त्वरित उतरवण्याची गरज असल्याचे मत पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गणेश अधटराव यांनी व्यक्त केले आहे. 
यामध्ये कोणत्याही अधिक कागद पञांची गरज नसुन ज्या नॅशनल बँकेमध्ये आपले खाते आहे त्या बँकेमधुन तो फाॅर्म घेऊन भरून द्यायचा आहे.या अगोदर हे दोन्ही विमा उतरवले असल्यास नंतर उतरवता येणार नाही.
व एका व्यक्तीचा एकाद्या बँकेत हे विमे उतरविले असल्यास दुसऱ्या बँकेत त्या चालु वर्षात हे विमे उतरवता येणार नाहीत. 
या मधिल प्रधानमंञी सुरक्षा विमा योजना ही 18 ते 70 वर्षांमधिल तर प्रधानमंञी जीवन ज्योती विमा योजना ही 18 ते 50 वर्षांमधिल नागरिकांना उतरवता येईल तसेच या मधिल प्रधानमंञी जीवन ज्योती विमा योजनेमध्ये सदर विमा धारकाचा कोणत्याही कारणावास्तव मृत्यू झाल्यास मृता च्या योजना फाॅर्मवरील वारसास दोन लाख रूपये मिळतात व प्रधानमंञी सुरक्षा विमा योजनेमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास मृताच्या वारसास दोन लाख रूपये मिळतात.

Leave a Reply