सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात शेतकरी हवालदिल

उस्मानाबाद / आसिफ मुलाणी- उस्मानाबाद तालुक्यातील कारी परिसरात सतत पडणाऱ्या रिमझिम पाऊस यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेतयामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहेअगोदरच लॉक डाउनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे यावर्षी पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबिन, उडीद, मूग ,आदी पिकांची पेरणी केली होती परंतु यामधील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबिन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.

अशा अनेक संकटांना तोंड शेतकऱ्यांना द्यावे लागले असताना मागील पाच-सहा दिवसापासून सतत पडणारा पाऊस आणि जास्तीचा पाऊस शेतकऱ्यांसाठी घातक ठरू लागला आहे. पिकामधील वाढलेले तण, अळ्यांचा प्रादुर्भाव यामुळे पिकं पिवळी पडू लागली आहेत तर जमिनीतील दलदलीमुळे मुळ्या कुजत आहेत.

हा सतत पडणारा पाऊस आणि वातावरणामुळे द्राक्षबागांना ही हानिकारक ठरू लागला आहे द्राक्ष बागेवर, भुरी, करपा, दावणी,रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना रोजच फवारणी करावी लागत आहे. या सर्व परिस्थिती मुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.खरीप हंगामातील पिकाबरोबर फळबागांचे ही  नुकसान होत आहे. खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे याकडेच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply