श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व लायन्स क्लब ऑफ सोलापूर, जिल्हा अंधत्व निवारण समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र तपासणी शिबिर

सोलापूर/शाम आडम  – श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व लायन्स क्लब ऑफ सोलापूर, जिल्हा अंधत्व निवारण समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवारी दिनांक २९/०८/२०२० रोजी क्रांती चौक कॉ गोदुताई विडी घरकुल येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते यात जवळपास ६० जणांना तपासणी करण्यात आली होती त्यात या नेत्र तपासणी दरम्यान ५ रूग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली.ह्या नेत्र तपासणी शिबिराकरीता डॉ शिवाजी पाटील,सुरज जाधव, रमेश देशपती व अंजली गायकवाड यांनी मार्गदर्शन केले व हे शिबीर यशस्वी करण्यासाठी  मंडळाचे विनायक भैरी, नागेश बंडी, महेश जक्कुल, संतोष बोडा, अमोल म्हंता, नागेश कासुल,पवन गुंडेटी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply