AgricultureBreaking News

शिवणी जमगाचा व्यंकटेश्वरा कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज – चेअरमन अभिजीत पाटील

पंढरपूर/नामदेव लकडे – आज व्यंकटेश्वरा साखर कारखाना युनिट३ लोहा. नांदेड येथील पहिल्या गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन प्रगतशील शेतकरी गंगाधर बाबा जामगे यांच्या शुभहस्ते आज पार पडले.गेल्या वर्षी पहिला चाचणी हंगाम घेण्यात आला होता, कारखाना लगतच गोदावरी नदी असल्याने भरपूर ऊस आहे यावर्षी पाऊसकाळ चांगला पडला असल्याने किंबहुना शेतकऱ्यांनी सुद्धा यंदा ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे, या हंगामात पुर्ण क्षमतेने कारखाना चालवून ५ लाख गाळप केले जाईल, शेतकऱ्यांनी कारखानाकडे नोंदणी करावी, ऊसासाठी निचिंन्त राहावे सर्व ऊसाचे गाळप होई पर्यंत कारखाना चालु ठेवू सर्व ऊस गाळपास आणला जाईल. वाहानाचे करार पुर्ण करुन घेऊन हंगाम वेळेत सुरु होईल.सध्या कोरोनाच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना काळजी घ्यावयास सांगितले, त्यांना पुढील हंगाम कार्यास शुभेच्छा दिल्या.असे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले.उपस्थित माऊली जामगे, गंगामामा जामगे, कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय पाटील, हनुमंत पाटील, धाके, चिफ इंजिनीअर पवार, चिफ केमिस्ट पेटे, शेती अधिकारी जाधव व कर्मचारी उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!