शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा या मागणीसाठी विद्यार्थी व युवक संघटनाचे उपोषण

 सोलापूर – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डिवायएफआय) तर्फे 23 मार्च रोजी शाहिद स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील शैक्षणिक समस्या आणि बेरोजगारिच्या विरोधात राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार या दोन्ही संघटनांच्या वतीने 23 मार्च रोजी सोलापुरातील दत्त नगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाच्या आवारात युवक आणि विद्यार्थ्यांनी लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.प्रारंभी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते शहिद भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपोषणस्थळी सर्व सामान्यांना न परवडणारी ऑनलाइन शिक्षण प्रणाली रद्द करा,तातडीने पारदर्शक नोकरभरती प्रक्रिया राबवा,शिक्षणाचे खाजगिकरण बंद करा आणि विविध मागण्यांचे फलक लावण्यात आले होते। याप्रसंगी dyfi चे महाराष्ट्र राज्याचे सचिव मंडळ सदस्य दत्ता चव्हाण आणि sfi चे जिल्हा अध्यक्ष माललेशम कारमपुरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. उपोषण करत असताना उपोषणकर्ते युवक आणि विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक गीते सादर केली. दरम्यान संयुक्त कामगार कृती समिती आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने अशोक इंदापुरे,नसीमा शेख,सुनंदा बल्ला यांनी उपोषणकर्त्याना पाठिंबा दिला.तसेच सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे महासचिव ऍड एम एच शेख यांनी उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्त्याना पाठिंबा दिला. याप्रसंगी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने मास्क परिधान केल्याचे दिसून आले। याप्रसंगी sfi चे जिल्हा अध्यक्ष राहुल जाधव, मीरा कांबळे, शामसुंदर आडम, राहुल भैसे, प्रशांत आडम, विजय साबळे, अश्विनी मामड्याल, पूनम गायकवाड, प्रिया किर्तने, dyfi चे जिल्हा अध्यक्ष मुन्ना कलबुर्गी,  प्रदेश उपाध्यक्ष अशोक बल्ला, जिल्हा सचिव अनिल वासम, अकिल शेख, आसिफ पठाण, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, प्रविण आडम, दिनेश बडगू, विनायक भैरी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply