लाईट बिल माफ करा अन्यथा महावितरण कंपनीला घेराव घालणार:- अझरुद्दीन सय्यद

प्रतिनिधी / हडपसर- मागील ६ ते ७ महिन्यांपासून संपूर्ण भारत देशात covid-19 संसर्गजन्य रोगामुळे लॉक डाऊन लावण्यात आलेले आहे सदर काळात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला कसलेही मजुरीचे काम व इतर व्यवसाय बंद असल्यामुळे मोठे आर्थिक अडचणीच्या सामोर जावे लागले आहे त्यामुळे सदरील काळातील महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्ह्यातील सर्व घरगुती,व्यावसायिक व सर्व प्रकारचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी मनसे युवानेते अझरुद्दीन सय्यद यांनी केली आहे.
  संपूर्ण देशामध्ये कोरोना सारख्या भयानक विषाणूच्या प्रादुर्भाव निर्माण झाला हजारो नागरीक या रोगाशी लढत आहे. या रोगामुळे लोकांना स्वतःचा कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे हे अत्यंत कठीण झाले आहे.सर्वसामान्य जनता सध्या तरी जगावे कसे या विवनचनेत आहेत, नोकऱ्या गेल्या आहेत असल्या तर पगार कमी झाले आहेत.आणि पगार मिळाले तर ते कापून मिळत आहे. शेती मालाला बाजारपेठेत उठाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे, छोटे व्यावसायिकांचे प्रश्न अधिक गंभीर आहेत व्यवसाय बुडाले आणि नव्याने काही केलं तर धंदा नाही. संघटित असंघटित कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. 
अजून हि शहरात वेगवेगळ्या भागात लाॅकडाऊन केले जात आहेत. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने मोलमजुरी करणाऱ्यांबरोबरच छोटे व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक टंचाई जणू लागली आहे .घरचे खर्च भागविता-भागविता अनेक कुटुंब मेटाकुटीला आले आहेत. दिशेचे संपूर्ण आर्थिक चक्र थांबलेले आहे. ज्यामुळे वीज बिल भरणे शक्य नसल्याने कोरोना प्रादुभाव मुळे निर्माण झालेला संकट पूर्णपणे नष्ट होई पर्यंतच्या काळात महाराष्ट्र शासनाने शेतकरी, छोटे व्यावसायिक,व्यापारी,संघटित असंघटित कामगार व सामान्य जनता या सर्वांचे  लाईट बिल माफ करावे असे अशी  मागणी हडपसर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अझरुद्दीन सय्यद यांनी  महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी यांच्याकडे केली आहे. लाईट बील माफ नाही केले तर मनसे तर्फे महावितरण कंपनीला घेराव घालण्यात येईल असा इशाराही  देण्यात आला आहे. या वेळी सनी लांडगे, अमित मिरेकर, फिरोज शेख व इतर उपस्थित होते.

Leave a Reply