लवंगी येथील भैरवनाथ शुगर चे बॉयलर पूजन , 5 लाख मे टन गाळप चे उद्दिष्ट – प्रा. शिवाजीराव सावंत

हुलजंती /अमीर आतार –  भैरवनाथ शुगर सातवा गळीत हंगाम ऊस उत्पादन शेतकरी व कामगार यांच्या विश्वासावर सुरू करत असून  कारखान्याच्या उभारी पासून या तालुक्यात व आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना आतापर्यंत विश्वास दाखवला असून त्याच विश्वासावर या कारखान्याचा चालू हंगाम पाच  लाख मे टन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे प्रतिपादन भैरवनाथ शुगर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते बॉयलर चे अग्नी प्रज्वलित करण्यात आले  प्रारंभी चंद्रप्रभा माने यांच्या हस्ते पूजा करण्यात आली . तसेच चंद्रकांत देवकर व सौ ज्योती देवकर यांच्या हस्ते  सत्यनारायणाची पूजा करण्यात आली  याप्रसंगी व्हाईस चेअरमन अनिल सावंत अविनाश वाडेकर विहाळ युनिट कार्यकारी संचालक केशव सावंत आलेगाव युनिटचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . 
पुढे बोलताना चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की कारखान्याचे संस्थापक आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगती पत्ता कडे वाटचाल करीत आहे 
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागात बेरोजगार तरुणांना भैरवनाथ शुगर कारखाना माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या व गावच्या व्यवहार चांगला होत असल्यामुळे कारखाना परिसरात तासगावचा साखर कारखान्यामुळे विकास होऊ लागला आहे . 
चालू करीत हंगामामध्ये पाच लाख मेघा टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी शेतकरी वाहतूकदार तोडणी तोडणी कामगार अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले
ह्या कार्यक्रमाला पंढरपूर श्याम गोसावी संदीप सलगर चे उपसरपंच बंडू जाधव इंद्रजीत पवार तानाजी चव्हाण शशिकांत निकम आदी उपस्थित होते. 

Leave a Reply