Breaking News

रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात काळा दिन

सोलापूर / किशोर झेंडेकर – केंद्र सरकार मार्फत रेल्वेचे खाजगीकरण करून 50 टक्के  रेल्वे मजूर, कर्मचाऱ्यांना बेरोजगार करण्याचा दुर्दैवी घाट घातला आहे.यांच्या विरोधात आपल्या मनगट व बाहुंना काळ्या फिती लावून निमंत्रक डी.रमेश बाबू यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा जोरदार निषेध केला. 
आज रोजी सेंट्रल रेल्वे ट्रॅकमेंटनर युनियनच्या वतीने रेल्वे खाजगीकरणाच्या निषेधार्थ शांततेत, एकजुटीने आंदोलन केले. आगामी काळात रेल्वे मजूर व कर्मचारी यांची रोजीरोटीवर गदा येऊ नये म्हणून आपली एकजूट मजबूत ठेवण्याचे आवाहन केले.याप्रसंगी नेताजी घोडके, संदीप चंद्रशेखर, आतिष, पंकज आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!