Breaking NewsPolitics

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या निवडी जाहीर

पंढरपूर/रवीशंकर जमदाडे -दि.1 आॅक्टोबर 2020 रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ,पंढरपुर तालुका व शहर कार्यकारिणी सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नवनिर्वाचित  प्रदेशाध्यक्ष मा.सुनील गव्हाणे यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रातील विद्यार्थी बांधवांना एक हक्काचे व्यासपीठ तयार करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी,राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात बांधिलकीची जाणीव जोपासण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी बांधवांना नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली.
उपस्थित-:   
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते ॲड.गणेश दादा पाटील, पंढरपूर तालुका अध्यक्ष मा.दिपक पवार, पंढरपूर शहर अध्यक्ष मा.सुधीर आबा भोसले, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य मा.अतुल खरात,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष सुजित गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सौरभ आयवळे पाटील, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा कार्याध्यक्ष राकेश साळुंखे, पंढरपूर शहराध्यक्ष संकेत घोगरदरे यांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या तालुकाध्यक्ष पदी ऋषिकेश मोरे,उपाध्यक्ष नवनाथ फाटे,कार्याध्यक्ष महेश उंबरकर,सोशल मीडिया प्रमुख किशोर पवार,कार्याध्यक्ष चैतन्य घाडगे,सरचटनिस विराज गायकवाड तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभे च्या सरचिटणीस तथा सोशल मीडिया प्रमुख पदी सुनील लेंडवे तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पंढरपूर शहर उपाध्यक्ष पदी ओंकार जगताप,शहर संघटक वैभव पवार,सरचिटणीस ओंकार शिंदे, सोशल मीडिया प्रमुख धीरज टिकोरे,सचिव ओंकार गोडसे,उपाध्यक्ष शुभम साळुंके आदी नवनियुक्त पदाधिकारी निवड करण्यात आल्या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सर्वांचे अभिनंदन केले..

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!