राष्ट्रवादी युवती काॅग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी किर्ती मोरे तर शहराध्यक्ष पदी डाॅ.अमृता मेनकुदळे यांची निवड

पंढरपूर/ नामदेव  लकडे -सोलापूर जिल्ह्यातील महिला व युवती  यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची गरज लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिला व युवती यांचे एक मजबूत संघटन तयार करून महिला व युवती यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नुतन पदाधिकारी निवडी करण्याच्या सुचना जिल्हा निहाय अध्यक्षांना दिल्या होत्या. .त्याप्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेस युवती पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी किर्ती रामचंद्र मोरे व पंढरपूर शहर अध्यक्ष पदी डाॅक्टर अमृता अनिल मेनकुदळे यांची निवड केली असुन त्यांना.त्यांच्या निवडीचे पञ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवती अध्यक्ष श्रीया भोसले,पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बालाजी मलपे,पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधिर भोसले, मराठा मावळा तालुका अध्यक्ष अॅqडव्होकेट महेश आटकळे आदी उपस्थित होते. 

Leave a Reply