Breaking News

युवा प्रतिष्ठान पांढरीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गावातील नागरिकांनी राबविलेला उपक्रम खूप स्तुत्य असून यातून येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळेल आणि गुणवत्ता यादीत येण्यासाठी प्रयत्न करतील असेच स्तुत्य उपक्रम गावाच्या हितासाठी नेहमी राबवले जावे,सर्वांचे मनस्वी अभिनंदन. यशस्वी  सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन – राजू घावटे सरपंच 

बार्शी / प्रतींनिधी – युवा प्रतिष्ठान पांढरीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.युवा प्रतिष्ठान पांढरीच्या वतीने 2014 पासून आज पर्यन्त समाज हिताचे अनेक कार्यक्रम राबविले जातात.यावर्षी कोरोना च्या संकटमुळे व सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करत 10 वी व 12वी मधे उतीर्ण झालेल्या विद्यार्त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पांगरी पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक शिरसट साहेब , पत्रकार इरशाद शेख , वकील श्रीधर जावळे उपस्थित होते. यावेळी नुमंत घावटे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मण घावटे यांनी तर आभार प्रदर्शन गणेश घावटे यांनी केले. हा कार्यक्रम पार पडन्यासाठी लक्ष्मण घावटे सर,महेश घावटे ,अच्युत घावटे , गणेश घावटे सर ,उपसरपंच राजू घावटे , दत्ता घावटे सर,प्रशांत घावटे, अमोल घावटे, वैभव घावटे ,गणेश सुतार ,अक्षय घावटे  यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!