माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची मुलाखत


मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरूवार दि. 16 डिसेंबर, 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाल नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षातील सामाजिक न्याय विभागाची वाटचाल, विद्यार्थी व दिव्यांगासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, ‘बार्टी’ या संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम, सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न. ग्रामीण व शहरी भागातील गाववाड्यांना समताधिष्ठित नावे देण्याचा निर्णय तसेच ज्येष्ठ नागरिक व तृत्तीयपंथीयांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय आदी विषयांची सविस्तर माहिती मंत्री श्री.मुंडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

००००Source link

Leave a Reply