सोलापूर – स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त महाबोधी बुध्द विहार येथे महाबोधी लेझींम संघाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे झोन क्र 2 चे कर्तव्यदक्ष जीई आशुतोष सावस्कर यांची उपस्थिती होती.
यावेळी महाबोधी लेझीम संघाचे अध्यक्ष आतिश सिरसट,अमोल दादा गोडसे,पिंटू जेठीथोर विकी शेंडगे सिद्धांत नागटिळक सैनिक तुळसे संपत जेठीथोर नेता शेंडगे चंद्रमणी साळवे,सम्यक बनसोडे,आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सम्यक बनसोडे यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय जेढिथोर यांनी केले.