मशिदीत केली रुग्णाच्या नातेवाईकाची राहण्याची सोय

 


बार्शी/प्रतिनिधी- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोणा  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि परिसरामध्ये कोरोणा विषाणू ने  थैमान घातलेले  सध्या पाहायला मिळत आहे.  येथील सर्वच दवाखाने कोरोना रुग्णा साठी आरक्षित केले असून हजारोंच्या संख्येने रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. मात्र रुग्ण उपचार घेत असताना त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची आणि राहण्याची होणारी गैरसोय ही महत्त्वाची बाब होती हे लक्षात घेऊन बार्शीत बागवान मक्का  मशिदी ने पुढे येऊन या मशिदे मध्ये 100 बेडचे नातेवाईकांसाठी राहण्यासाठी सोय केली आहे.  अनेक जण कोरोणाच्या संकटास तोंड देत आहेत त्यात आता बार्शीतील शिवसेना  नेते भाऊसाहेब आंधळकर व बागवान मक्का मदीना चे सर्व विश्वस्त यांनी मिळून ही व्यवस्था केली आहे. बागवान मक्का मस्जिद यांच्या संयुक्त विद्यमाने मज्जिद च्या जागेमध्ये शिवसेनेने केली बार्शी शहर तालुक्याच्या बाहेरील भूम,  परांडा , उस्मानाबाद,  जामखेड खर्डा , अहमदनगर,  पुणे , मोहोळ,  करमाळा येथील को बीड पेशंटच्या 100 स्त्री-पुरुष नातेवाईकांची मोफत राहण्याची आणि उत्तम जेवणाची सोय एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन याचा औचित्य आणि बार्शीचे सुपुत्र असलेले झारखंड येथे कार्यरत असणारे  जिल्हाधिकारी रमेश घोलप यांचा वाढदिवस याचे निमित्ताने आयोजित केला असल्याचे भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले.

Leave a Reply