मराठवाडा विद्यापीठानं पुढे ढकलल्या परीक्षा, यामुळे ओढवली नामुष्की!

 

प्रतिनिधी/अक्षय वायकर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. येत्या 1 ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू होणार होती. मात्र, ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने याबाबत एक परिपत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार, 1 ऑक्टोबर 2020 पासून अंतिम वर्षाच्या परीक्षा निश्चित करण्यात करण्यात आल्या होत्या. परंतु विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऐन परीक्षेच्या तोंडावर लेखणी बंद आंदोलन सुरू केल्यामुळे परीक्षा नियोजित तारखेला सुरू करणं, शक्य नाही. 1 ऑक्टोबरला सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचं सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे, अलं परीक्षा व मूल्यमापन मंडळानं सांगितलं आहे.

Leave a Reply