भानुदास यादव यांची लेखा आणि कार्यक्रमाधिकारी पदी बढती

 

सातारा/विशेष प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्र संघटनेचे लेखाधिकारी श्री भानुदास यादव  सर यांना युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार तर्फे लेखा आणि कार्यक्रम अधिकारी पदी बढती देण्यात आलेली आहे. श्री भानुदास यादव हे १९८९ साली युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र संघटनेमध्ये रुजू झाले होते, गेली ३२ वर्षे ते युवा विकासाच्या क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत.त्यांनी यापूर्वी सांगली, कोल्हापूर, पुणे, पणजी, सातारा या ठिकाणी सेवा केलेली आहे. भानुदास यादव सर यांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित युवकांची देशप्रेमी, सामाजिक कार्य करणारी युवकांची फौज निर्माण करून युवा मंडळांच्या माध्यमातून लोक चळवळ उभी केली आहे.त्यांचे कडून प्रेरणा घेऊन अनेक युवक सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये विविध पदांवर यशस्वीपणे कार्य करीत आहेत.

One thought on “भानुदास यादव यांची लेखा आणि कार्यक्रमाधिकारी पदी बढती

Leave a Reply