भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा कुंडल ग्रामपंचायतीकडे रणसंग्राम सोशल फौंडेशन ची मागणी

पलूस – कुंडल येथे भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसत आहे. यामुळे लहान बालके, नागरिक मोठ्या प्रमाणावर जखमी होत आहेत.कुत्र्यांनी हल्ला केलेल्या बालके व नागरिकांना जीवघेणा शारीरिक, मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.शहरी भागात लहान बालकांवर  मोकाट कुत्र्यांचे प्राणघातक हल्ले झालेले आपण वरचेवर पाहतो आहे.ही वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी ग्रामपंचायतकडून नियोजन होणे गरजेचे आहे..
कुत्रे चावल्यावर कुंडल येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करण्यात येतो.परंतु पुढील महत्वाची रेबीज ही प्रतिबंधक लस घेण्यासाठी रुग्णाला सांगली येथिल शासकीय रुग्णालय येथे जाऊन उपचार घ्यावे लागतात.लॉकडाऊन च्या काळात सामान्य लोकांना वाहतुकीच्या साधना अभावी  सांगली येथे जाऊन उपचार घेणे हे खूप त्रासदायक होत आहे. लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये  कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 100 पेक्षा जास्त नागरिकांना कुत्रे चावल्याची गंभीर माहिती समोर येत आहे.याबाबत नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत 
कुंडल ग्रामपंचायतीने  तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.कुंडल ग्रामसेवक यांना याबाबत निवेदन देण्यात आले.भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदी योजना अवलंबावी, गावातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन व मास विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर  नियंत्रण बाबतीत ठोस पावले उचलावीत.तसेच कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या कुटुंबाना ग्रामपंचायतीने विशेष ऍम्ब्युलन्स द्वारे सांगली येथिल शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मोफत सोय करावी.अशी मागणी रणसंग्राम सोशल फौंडेशन च्या वतीने करण्यात आली.यावेळी अँड दिपक लाड, डॉ जमीर नदाफ, दिलीप शिंदे, शिवाजी रावळ, हनीफ शेख, शाहिद मुल्ला, सचिन शिंदे, वसीम मुलाणी उपस्थित होते.

Leave a Reply