बार्शी टेक्निकल हायस्कूलचा निकाल 96.29%

बार्शी /अब्दुल शेख – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला .बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बार्शी टेक्निकल हायस्कूल बार्शी इयत्ता दहावी मार्च 2020 चा निकाल 96.29% लागला आहे.
मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राऊत अविनाश ज्योतीराम  95% (प्रथम) ,पासले रोहित संतोष 93.20%(द्वितीय) ,हुकिरे सिद्धार्थ संतोष 85.60% ( तृतीय)  उदमले गणेश लक्ष्मण 85% 4 था क्रमांक पटकवला आहे.
संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती प्रभाताई झाडबुके व संचालिका वर्षाताई गुलाबराव ठोंबरे तसेच संस्थेचे सचिव उत्तरेश्वर बेणे मुख्याध्यापक श्री विक्रम टकले सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply