Breaking NewsPolitics

बँक खाजगीकरण विरोधी मोहिमसह देशभरातील खाजगी करणाला भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून विरोध ,गावोगावी जाऊन जनजागृती ,सह्याची मोहीम सुरू.

पारगाव:- वाशी तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पार्टी च्या वतीने केंद्र सरकार कडून होत असलेल्या खाजगीकरणाला विरोध केला जात आहे.सध्या बँक खाजगीकरणं होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.त्या संदर्भात व विविध क्षेत्रातील खाजगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी गावोगाव जाऊन जनजागृती केली जात आहे.या खाजगीकरण विरोधी सह्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
अधिक माहिती अशी की,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसेक्रेटरी कॉ.पंकज चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाशी तालुक्यातील विविध गावात जाऊन नागरिकांत केंद्राकडून होत असलेल्या खाजगीकरण विरोधी संदर्भात जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे.दि.31 ऑक्टोबर रोजी सकाळी तालुक्यातील लाखणगाव येथे कॉ.पंकज चव्हाण यांनी नागरिकांना संबोधित केले.केंद्र सरकार प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण करत असल्याने गोरगरिबांना ,मजूर वर्गाला,शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसत आहे.रेल्वेचे खाजगीकरण केले आहे.साधं फ्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी ही आता पन्नास रुपये लागत आहेत. गरीबाच्या पोरांना रेल्वेत बसणं सोडा फ्लॅटफॉर्म पाहण ही शक्य होणार नाही.सध्या बँकेचे खाजगीकरण करणं सुरू आहे आणि वेळीच जर जनतेने याला विरोध दाखवून जनक्षोभ उभारला नाही तर आपण कष्ट करून ठेवलेली जमपुंजी ही आपण आपल्याला हवे तेंव्हा काढू शकणार नाहीत.शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही.तेंव्हा सर्वांनी या खाजगिकरण विरोधी मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.यावेळी लाखणगावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर  शारीरिक अंतर ठेवून उपस्थित  होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!