Breaking NewsEducation

फ्युचर अकॅडमी स्कुलचे थाटात उदघाटन

सोलापूर /अमीर आत्तार –  सोलापूर येथील सर मोक्ष गुंडम विश्वेश्वरय्या प्रतिष्ठान संचालित प्यूचर अकॅडमी इंग्लिश मेडीयम स्कुल चे उदघाटन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्याहस्ते करण्यात आले सदर उदघाटन कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार होते. 
सक्षम, आदर्श,   विध्यार्थी घडवण्याचे काम शिक्षकचं करू शकतात ,  शिक्षक हा खरा गुरु असून देशाला नवी दिशा, उमेद, सामर्थ अन  मार्गदर्शनाचे  करण्याचे काम आता शिक्षकांना करावे लागणार असे प्रतिपादन करून नव्याने सुरु केलेल्या प्यूचर इंग्लिश स्कुल  अकॅडमी च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.  ग्रामीण भागातील तरुण, तरुणी, व ग्रहणीना आपला संसार सांभाळून  घरबसल्या आपला शैक्षणिक व्यवसाय सुरु करण्याची सुवर्णसंधी मिळावी या उदात्त हेतूने प्यूचर अकॅडमी ने टीचर ट्रेनिंग ,डिप्लोमा इन कम्प्युटर टीचर ट्रेनिंग ,डिप्लोमा इन नर्सरी टीचर ट्रेनिंग,ब्युटी थेरपीअसे विविध कोर्स सुरु केले असून या कोर्स च्या लाभ घेऊन जास्तीस जास्त महिलांनी लाभ घेऊन स्वतः च्या पायावर उभे राहण्याचे आवाहन प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी केले आहे . 
याप्रसंगी प्यूचर अकॅडमी संस्थेचे गौरीशंकर कराळे यांच्या हस्ते प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा शाल घालून सत्कार करण्यात यावेळी संस्थेच्या प्रियंका साळुंखे, निलेश साळुंखे, कल्पना तेलंग, दीपाली शिंदे, स्वाती विभुते, वैशाली पाटील या शिक्षिका व शिक्षक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!