पुण्यातील नवनाथ फडतरे यांची आय.आय.टीत संशोधनासाठी निवड

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर मधील नवनाथ फडतरे यांची आय.आय.टी गुवाहाटी आसाम राज्य येथे पी.एच.डी साठी निवड झाली आहे.”इंडीयन डिप्लोमँटीक हिस्टरी अॅंन्ड इंटरनॅशनल हिस्टरी” यामध्ये ते संशोधन करणार आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुंटुबांतील नवनाथ यांचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.

फडतरे यांनी साविञीबाई फुले पुणे विद्यापीठातुन पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे. इंडीयन इंट्यिट्युट आॅफ टॅक्नोलाॅजी अर्थात आय.आय.टी गुवाहाटी मधुन पदव्युत्तर पदवी पुर्ण केली असुन यापुर्वी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयु) दिल्ली मधुन “मास्टर आॅफ फिलाॅसाॅफी इन चायनीज स्टडीज” (एम.फिल ) साठी निवड झाली आहे. कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना मराठी माध्यमात, वर्गखोल्या नसल्याने मंदिरात शिक्षण घेवुनही नवनाथ यांनी आय.आय.टी.प्रवेश , नेट , गेट आणि आता भारतातील नामांकीत असणार्या आय.आय.टी गुवाहाटी आसाम राज्य येथे संशोधनासाठी साठी निवड झाली आहे .

नवनाथ यांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंतचे शिक्षण , आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावात पुर्ण केले. अकरावी -बारावीत असताना शेतातील कामे तसेच ,डोंगराला जनावरांना चारायला नेताना तिकडे इंग्रजी पुस्तकांचे वाचन तसेच प्रवास करताना बसमधुन ये- जा करताना मोकळ्या वेळेत इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह वाढविण्यासाठी कायम भर देत असत ,भविष्यात याचा त्यांना फायदा होत गेला.शेतकरी वर्गातील मुलां- मुलींनी इंग्रजी बद्दल भिती बाळगु नये. रोज नवनवीन शब्द शिकण्यावर भर दिला पाहीजे ,असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply