Breaking News

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाला विरोध करणा-या ‘या’ माजी मंत्र्यांचे नाव समितीतून वगळा- धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांची मागणी

पंढरपूर/नामदेव लकडे -सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी होत असताना त्यांच्या नावाला विरोध करणारे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे समितीत कसे ? त्यांना स्मारक समितीतून वगळा,’ अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींचे स्मारक धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून करण्याचा घाट कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी घातला आहे. या प्रकरणातील त्यांचे कामकाज संशयास्पद असल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक हे सरकारी निधीतून झाले पाहिजे,’ अशी भूमिका ढोणे यांनी मांडली आहे. या प्रकरणी आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!