AgricultureBreaking NewssolapurTech News

पीक कर्जासाठी करा मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज

जिल्हा अग्रणी बँकेचा उपक्रम; घरबसल्या मिळणार शेतकऱ्यांना सुविधा

सोलापूर, दि.6 : जिल्हा अग्रणी बँकेतर्फे शेतकऱ्यांना कोविड-19 च्या गंभीर परिस्थितीमध्ये पीक कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. खरीप पीक कर्ज हवे असलेल्या शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे घरबसल्या अर्ज करता येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी www.solapur.gov.in या वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी केले आहे. प्रक्रिया आणि लागणारी कागदपत्रे 

  • शेतकऱ्यांना स्वतःचे आधारकार्ड व पॅनकार्ड आवश्यक आहे. एक शेतकरी एका आधारकार्डावरून एकच अर्ज करू शकतो. 
  • शेतीचा सातबारा, आठ अ, मोबाईल नंबर, पीक लागवडीचे तपशील, बँक खाते नंबर, बँकेचे नाव, गावाचे नाव, तालुका इत्यादी माहिती शेतकऱ्याजवळ आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याने www.solapur.gov.in या वेबसाईटवर क्लिक करावे. 
  • फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
  • गाव ज्या बँकेकडे दत्तक आहे, शेतकऱ्यांनी त्याच बँकेची निवड करून आपला मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅन नंबर, शेतीचा गट नंबर, पिकाची सविस्तर माहिती व कर्ज रक्कम ही सर्व माहिती ऑनलाईन भरायची आहे. फॉर्म भरून ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे. 
  • शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेली माहिती जिल्हा अग्रणी बँकेत एकत्र केली जाते. बँकेच्या नावाप्रमाणे बँकेने दिलेले जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे ती माहिती पाठवली जाते. जिल्हा व्यवस्थापकाकडून ती माहिती संबंधित शाखेपर्यंत पोहोचली जाते. ही कार्यवाही पूर्ण होण्यास तीन दिवसाचा अवधी जिल्हा अग्रणी बँकेने बँकेला दिलेला आहे. शेतकऱ्यांना तीन दिवसांमध्ये बँकेचा फोन किंवा एसएमएस आला नाही तर संबंधित शेतकऱ्याने कागदपत्रे घेऊन संबंधित शाखेशी संपर्क करायचा आहे.
  • जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शाखेमध्ये गर्दी न करता घरी बसून स्वतः किंवा आपल्या घरातील सुशिक्षित व्यक्तीकडून हा ऑनलाईन पीक कर्ज फॉर्म व्यवस्थित भरून घेऊन तो सबमिट करावा, असे आवाहन श्री. नाशिककर यांनी केले आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!